मतदानानंतर तरुणाई शहरांकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

रोहा : तालुक्‍यातील हजारो तरुण रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक शहरांत राहत आहेत. विधानसभा मतदानासाठी त्यामधील बहुसंख्य तालुक्‍यात आले होते. त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावून पुन्हा शहरांकडे परतीचा प्रवास सुरू केला. त्यामुळे ठिकठिकाणच्या नाक्‍यावर मोठी गर्दी झाली होती. 

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका म्हणून रोह्याची ओळख आहे. हा तालुका पेण, श्रीवर्धन आणि अलिबाग या तीन मतदारसंघात विभागलेला आहे. तालुक्‍यातील बहुसंख्य तरुण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यापासून सुरतसारख्या शहरात स्थायिक आहेत. मात्र आपला लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आवर्जून गावी उपस्थित झाले होते. मतदान केल्यानंतर ते दुपारी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेले दिसले. त्यामुळे बहुसंख्य नाक्‍यांवर वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्यांची गर्दी होती.

पेण मतदारसंघातील दुरटोळी केंद्रावर मतदान करून सकाळीच परतीच्या प्रवासाला निघाली असल्याचे ठाण्यात राहणाऱ्या आयुषी दळवी या आयटी अभियंता असलेल्या तरुणीने सांगितले. बोरिवली येथे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे राज ढमाले, स्वप्नील जांभळे, राकेश पिंपळकर, अनिकेत सानप, यशोदाय चिंचुरकर, विशाल वडे आदी २४ तरुण रात्री रोहा येथे येऊन आज केंद्रावर मतदान करून संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue