कर्जतमध्ये सखी केंद्रांवर महिलांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

नेरळ : कर्जत विधानसभा मतदारसंघात बनविण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथे सेल्फी काढण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी भेट देऊन लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्याबद्दल मतदारांचे कौतुक केले.

कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आले आहेत. कर्जत शहरात शारदा मंदिर शाळेत असलेल्या १७१ क्रमांकाच्या मतदान केंद्र येथे सखी मतदान केंद्र बनविण्यात आले आहे. येथील मतदान केंद्रातील सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी या महिला असून त्या ठिकाणी सुरक्षेवरदेखील महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

केंद्राध्यक्ष म्हणून अरुणा गंगावणे; तर केंद्रात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिभा साळोखे, भाग्यश्री बोरसे, शीतल पुरी, ज्योती सरगर आणि केंद्रातील शिपाई म्हणून पवार काम पाहत आहेत. या केंद्रावर सुरक्षेची जबाबदारी दीपा खाडे यांच्याकडे होती.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी या सखी मतदान केंद्राला बाहेरून सुशोभित करण्यात आले असून त्या ठिकाणी एक सेल्फी पॉईंटदेखील बनविण्यात आला आहे. या पॉईंटवर महिला मतदारांना मतदान केल्यानंतर फोटो काढावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. 
याशिवाय मतदान केल्यानंतर अन्य मतदारांनी देशाची लोकशाहीला बळकट करण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार सह्या करून मतदान केल्याची नोंद करत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue