माथेरानमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

माथेरान ः कर्जत-खालापूर विधानसभा निवडणुकीसाठी माथेरानमध्‍ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. येथील ९१ ते ९४ या चार केंद्रांत सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता. दुपारनंतर मतदारांनी केंद्रावर गर्दी केली. ३ हजार ६६६ एकूण मतदार संख्या असलेल्या माथेरानमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला.

माथेरान नगरपालिकेकडून दिव्यांग मतदारांना रुग्णवाहिकेची सुविधा केली होती; मात्र कर्करोगबाधित रुग्णांना स्वखर्चाने मतदान केंद्रावर जावे लागले. कर्करोगबाधित रुग्णांना रुग्णवाहिकेची सुविधा दिली नसल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक वाढतील, असा माथेरानकरांचा अंदाज पूर्ण चुकीचा ठरला. कोणीही पर्यटक नसल्याने स्थानिक मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.

दुपारी २ नंतर महिलांचा टक्का वाढला. काही महिलांकडे मोबाईल असल्याने १०० मीटरच्या आत मोबाईल बंदी पोलिसांकडून करण्यात आली. मोबाईल ठेवण्यासाठी महिलांची तारांबळ उडाली होती. मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue