माणगावात भाज्या स्वस्त 

इंदापूर बाजारात विक्रीसाठी लावलेले भाज्यांचे वाटे
इंदापूर बाजारात विक्रीसाठी लावलेले भाज्यांचे वाटे

माणगाव : परतीच्या पावसामुळे स्थानिक भाज्या संकटात सापडल्या होत्या. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने माणगाव, इंदापूरच्या बाजारात विक्रीसाठी पुन्हा स्थानिक भाज्या दिसू लागल्या आहेत. भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे दरही निम्म्यावर आले आहेत. साधारणपणे दहा रुपयांना एक वाटा या पद्धतीने आदिवासी व ग्रामीण महिला या भाज्या विकत आहेत. एका वाट्यात पाच ते सहा वांगी असतात. मिरच्या, भेंडी व इतर भाज्यांचेही वाटे लावण्यात आले आहेत. याआधी स्थानिक भाज्यांचे दर 15 ते 20 रुपयांच्या दरम्यान होते. 

माणगाव तालुका गावरान भेंडी, वांगी, मिरची, गवार या भाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. संततधार पावसाने भाजीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे गावरान भाज्यांची बाजारातील आवक वाढली आहे. चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या भाज्यांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. सेंद्रिय पद्धतीने होणाऱ्या स्थानिक भाज्यांना पर्यटक व स्थानिकांकडून मोठी मागणी असते.

गावरान भाज्या खाण्यास खूप चविष्ट असतात. या वर्षी अतिपावसामुळे यांची चव दुर्मीळ होती. मात्र आता थोड्या प्रमाणात या भाज्या मिळत आहेत. त्या आवर्जून विकत घेतो. खासकरून भरीत करण्यासाठी वांगी प्रसिद्ध असल्याचे माणगाव येथील गृहिणी सायली आरसे यांनी सांगितले. पावसाने या भाज्या झाल्या नाहीत. या महिन्यात पाऊस नसल्याने थोडीफार भाजी मिळते. मात्र सध्या भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दहा रुपये वाट्याने भाजी विकत असल्याचे माणगाव येथील चंद्रा वाघमारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com