महाडमध्ये भरत गोगावले यांची हॅट्ट्रिक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

महाड : महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी 21 हजार 256 मतांनी दणदणीत विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे; तर कॉंग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांना 80 हजार 114 मतांवर समाधान मानावे लागले. 

महाड : महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी 21 हजार 256 मतांनी दणदणीत विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे; तर कॉंग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांना 80 हजार 114 मतांवर समाधान मानावे लागले. 

महाड मतदारसंघात मुख्य लढत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले व कॉंग्रेसचे जगताप यांच्यात होती. गेल्या अनेक वर्षांपासून महाड मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. 2009, 2014 आणि आता 2019 मध्ये गोगावले यांनी पुन्हा या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे. शिवसेनेने एकूण मतदानाच्या तब्बल 52 टक्के मते पदरात पाडून हा विजय मिळालेला आहे.

2014 मध्ये शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते; परंतु यावेळी आघाडी झाल्याने दोन्ही उमेदवारांच्या मतात वाढ झालेली आहे. या पराभवातही माणिक जगताप यांच्या मतांमध्ये झालेली सात हजारांची वाढ कॉंग्रेससाठी समाधानकारक बाब आहे; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मतदार असलेल्या माणगावमधून कॉंग्रेसला फारशी साथ मिळाली नाही. येथून शिवसेनेला मोठे मताधिक्‍य मिळाले.

कॉंग्रेससोबत प्रामुख्याने राहणारा मुस्लिम मतदार यावेळी केवळ गोगावले यांच्यामुळे शिवसेनेकडे अधिक प्रमाणात झुकला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले ढासळले. पालिकेमध्ये सत्ता असूनही कॉंग्रेसला येथून मताधिक्‍य मिळवता आले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue