जिल्‍ह्यात 29 हजार मतदारांकडून "नोटा"चा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 29 हजार 97 मतदारांनी "नोटा"ला पसंती दिली. महाड मतदारसंघात सर्वात कमी 2 हजार 47; तर पनवेलमध्ये सर्वाधिक12 हजार 371 जणांनी "नोटा'चा वापर केला. 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 29 हजार 97 मतदारांनी "नोटा"ला पसंती दिली. महाड मतदारसंघात सर्वात कमी 2 हजार 47; तर पनवेलमध्ये सर्वाधिक12 हजार 371 जणांनी "नोटा'चा वापर केला. 

मतदार यादीतील एकाही उमेदवाराला मतदान द्यायचे नसेल, तर मतदान यंत्रात मतदाराला नकाराधिकार दर्शवण्यासाठी "नोटा' नावाचे बटन ठेवण्यात आले आहे. पनवेल मतदारसंघात "नोटा'चा सर्वाधिक वापर करण्यात आला. श्रीवर्धन मतदारसंघात 3 हजार 772 मतदारांनी "नोटा'चा वापर केला.

"नोटा'चा वापर प्रभावीपणे केल्याने जिल्ह्यातील उरण मतदारसंघातील निकालाला कलाटणी मिळाली. येथे 3 हजार 77 जणांनी "नोटा'ला पसंती दिली. त्यामुळे चुरशीच्या लढतीत महेश बालदी यांचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीतही रायगडमधील 11 हजार 490 मतदारांनी "नोटा'चा वापर केला होता. यामध्ये पनवेल, उरण, कर्जत या मतदारसंघातील आकडेवारीसह साधारण 24 हजार मतदारांनी "नोटा'ला पसंती दिली होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue