परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पीक घेतले आहे. परिसरात समाधानकारक पावसामुळे पीक चांगले आले होते; मात्र परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

रसायनीः रसायनी पाताळगंगा परिसरात परतीच्या पावसाचा फटका भाताच्या पिकाला बसला आहे. पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतावर कापणी केलेल्या भातपिकाचे आणि तयार पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
 
बहुतके शेतकऱ्यांनी जया, आवनी, रत्ना, शुभांगी, कर्जत कोलम आदी जातीच्या वाणाचे पीक घेतले आहे. परिसरात समाधानकारक पावसामुळे पीक चांगले आले होते; मात्र परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कापणी केलेले भातपीक भिजले आहे. त्यामुळे कोंब येऊ लागले आहे. पाऊस काही पाठ सोडत नसल्यामुळे जे मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी आज झोडपणीचे काम सुरू केले आहे, असे तुराडे येथील गणेश तुकाराम ठाकूर यांनी सांगितले. 

रसायनी ः परतीच्या पावसाने भातपिकाचे झालेले नुकसान. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue