वातावरणातील बदलांनी परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

रोहा : परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम आणि पश्‍चिम किनाऱ्यावरील वादळी वातावरणामुळे हिवाळ्यात कोकणात येणारे अनेक पक्षांचे आगमन लांबणीवर पडले आहे. ब्राह्मणी बदक किंवा चक्रांग, चमचा पक्षी, धोबी असे युरोप देशातून ऑक्‍टोबरमध्ये येणारे अनेक पक्षी नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरीही अजूनही आलेले नाहीत. यावर्षी ७० टक्‍क्‍यांहून अधिक प्रजाती कोकणात पोहोचल्या नसल्याने पक्षी निरीक्षक व पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. 

दरवर्षी सप्टेंबर अखेर पावसाला पूर्णविराम मिळून हिवाळा सुरू होतो. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यापासून कोकणात येणारे स्थलांतरित पक्षी दिसण्यास सुरवात होते. मात्र, या वर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा सरत आला तरीही पाऊस सुरुच आहे. त्यामुळे हिवाळा लांबणीवर पडला असून हिवाळ्यात कोकणात येणारे स्थलांतरित पक्षी अजूनही पोहोचलेले नाहीत. 

बदलते जागतिक हवामान, बदलत जाणारे ऋतुमान व यावर्षी भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर आलेली वादळे यामुळे पक्षी संभ्रमित झाल्याचे मत पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केले. त्यामुळे स्थलांतरित पक्षांचे आगमन लांबणीवर पडले असून हवामान बदलाचा गंभीर परिणाम निसर्गातील पशु-पक्षांवर होत असल्याचे माणगाव येथील पक्षी अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी यावेळी सांगितले. 

ऑक्‍टोबरपासून कोकण किनारपट्टी भागात १०० पेक्षा अधिक स्थलांतरित पक्षांच्या प्रजाती पोहोचतात. मात्र, यावर्षी ७० टक्‍क्‍यांहून अधिक प्रजाती अजूनही पोहोचलेल्या नाहीत. ब्राह्मणी बदक किंवा चक्रांग, चमचा पक्षी, धोबी असे युरोप देशातून ऑक्‍टोबरमध्ये येणारे अनेक पक्षी नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी आलेले नाहीत. बदलत्या ऋतुमानाचा पक्षांवर परिणाम होत असून त्यांच्या स्थलांतराच्या सवई, आवास व आहारात गंभीर बदल होत असल्याचे मत पक्षीतज्ज्ञ तुषार पाटील यांनी व्यक्त केले आहे. नैसर्गिक ऋतुचक्राच्या बदलांबाबत गंभीरतेने विचार करण्याची आवश्‍यकता असल्याचे गिरी भ्रमण निसर्ग संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सप्रे यांनी या वेळी व्यक्त केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue