खंडाळा घाटात ट्रकची कंटेनरला धडक

अपघातग्रस्‍त ट्रक.
अपघातग्रस्‍त ट्रक.

खोपोली : खंडाळा घाटातील अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे गुरुवारी झालेल्या अपघाताने दिसून आले. खंडाळा घाटात गुरुवारी ट्रकने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. 

सुनील शेलार (वय ५२, रा. मावळ, वडगाव), अरुण मोहिते (वय ४०, रा .सांगली) अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता खोपोली एक्‍झिट तथा एक्‍स्प्रेस वे ब्रीजजवळ कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व डेल्टा फोर्सचे जवान, खोपोली पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ मदत करून जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले. अपघातग्रस्त ट्रक दोन क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com