जिल्हा परिषदेच्या समित्‍यांची नव्‍याने रचना?

संग्रहित
संग्रहित

अलिबाग ः जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १५) होत आहे. आमदार म्हणून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या अध्यक्षपदातील ही शेवटची सभा असेल. याच सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह सर्व समित्यांची नव्याने रचना होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा विशेष लक्षणीय ठरणार आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर ही जिल्हा परिषदेची पहिलीच सभा असल्याने निवडणुकीतील राजकीय पडसादही या सभेवर उमटण्याची शक्‍यता आहे. भातशेतीचे नुकसान, पावसामुळे नादुरुस्त झालेल्या शाळा इमारतींचा प्रश्‍न, भविष्यातील पाणीटंचाई कृती आराखडा यासारखे विषय चर्चेला मांडले जातील. यापूर्वीची सभा २२ ऑगस्टला नियोजन भवनाच्या सभागृहात झाली होती. याच ठिकाणी शुक्रवारची सभा होत आहे. अदिती तटकरे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपलेला आहे. त्यातच त्या आमदार म्हणून विजयी झालेल्या असल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्यपदासह अध्यक्षपद आपोआपच रिक्त होणार आहे.

सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकारिणीने २१ मार्च २०१७ रोजी सत्ता सूत्रे स्वीकारली होती. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत आघाडी स्थापन केली, ही आघाडी अद्याप कायम आहे. 
सर्वांत जास्त सदस्य संख्या असलेल्या शेकापने (२३) कमी सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला (१२) पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्षपदाचा मान दिला होता. आता पुढील अडीच वर्षासाठी शेकापच्या उमेदवाराला अध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे; परंतु या पदावर वर्णी कोणाची लागणार, हे शुक्रवारच्या सभेतच समजणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com