लग्न सभारंभातून सोन्‍याचा आहेर गायब

रोहा : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.
रोहा : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.

रोहा : गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम लग्नसभारंभातही पाहायला मिळत आहे. पूर्वी वाढदिवस, बारसे यासारख्या लहान समारंभात सोन्याची अंगठी, साखळी, कर्णफुले, कुड्या अशा वस्तू भेट दिल्या जात होत्या. आता सोन्याच्या वस्तू खरेदी करणे परवडत नसल्याने लग्नसभारंभात आहेरात रोख रक्कम देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे सोन्याची विक्री निम्म्याहून अधिक घटल्याचे बहुतांश सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. 

९११ हॉलमार्क सोन्याची किमत ३८ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. टॅक्‍स व घडणावळ मिळून तोळाभर सोने ४० हजारांहून अधिक किमतीला पडत आहे. ही किंमत सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नसल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोन्याची विक्री निम्म्याहून अधिक घटल्याचे कोलाड येथील मंगलदीप ज्वेलर्सचे मालक पारसमल जैन यांनी सांगितले. 

आर्थिक बचत होत नसल्याने सर्वसामान्यांना हौसेने सोने खरेदी करणे दुरापास्त झाल्याचे व्यापारी मितेश जैन यांनी सांगितले. पूर्वी वाढदिवस, बारसे यासारख्या लहान समारंभात सोन्याची अंगठी, साखळी, कर्णफुले, कुड्या अशा वस्तू भेट दिल्या जात होत्या. आता सोन्याच्या वस्तू खरेदी करणे परवडत नसल्याने आहेरात रोख रक्कम देण्याची प्रथा सुरू झाली आहे. अगदीच टाळण्यासारखे नसल्यास ग्राहक सोने खरेदी करतो. त्यामुळेही सोनेखरेदीचे प्रमाण घटल्याची माहिती महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक मनीष जैन यांनी यावेळी दिली. 

वाढत्या महागाईत बचत होणे कठीण झाले आहे. त्यात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी सोनेखरेदी शक्‍य होत नसल्याचे मत ग्राहक दिनेश कोदे यांनी व्यक्त केले.

मुलाचे लग्न आहे. सुनेसाठी बांगड्या करायची इच्छा होती; मात्र बजेट नसल्याने अंगठी खरेदी केली.
- राजेश जाधव, ग्राहक 

सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वीप्रमाणे हौसेने व आहेरासाठी सोने खरेदी होत नाही. गेल्या पाच वर्षांत विक्रीत निम्म्याने घट झाली आहे.
- सुरेश जैन, मालक, महालक्ष्मी ज्वेलर्स, कोलाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com