रायगड जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले

संग्रहित
संग्रहित

अलिबाग : १४ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक; तर १४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायतींसाठी ८ डिसेंबरला मतदान होणार आहे. 

महाड तालुक्‍यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड; तर कर्जत तालुक्‍यातील तिवरे व वरईतर्फे निड या पाच ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर ते मार्चमध्ये संपणार आहे. या ५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक; तर अन्य १४५ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होणार आहे. 

अलिबाग तालुक्‍यातील बामणगाव, पेणमधील मुंढाणी, उरण तालुक्‍यातील जुई, खालापुरातील गोरठण बुद्रुक, रोहा तालुक्‍यातील तळवली तर्फ अष्टमी, महाड तालुक्‍यातील चिभावे मोहल्ला, कुंभे शिवरथर, तळीये, पोलादपूर येथे पैठण, श्रीवर्धन तालुक्‍यातील चिखलप, कुडकी, भोस्ते, शेखाडी, म्हसळा तालुक्‍यातील खरसई या ग्रामपंचायतींमध्ये १४ सरपंचपदाची पोट निवडणूक होणार आहे. १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात भरण्यात येणार आहेत. २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जावर छाननी केली जाणार आहे.

९ डिसेंबरला​ मतमोजणी
नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राबविली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान केंद्रामध्ये मतदान होणार असून मतमोजणी ९ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्‍चित करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com