अलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांमुळे फुलले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

अलिबाग : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी सकाळी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता.

अलिबाग : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी सकाळी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता.

अनेक पर्यटकांनी घोडागाडी, उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. त्यामुळे येथील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलले होते. या वेळी खोल समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा जीवरक्षकांकडून देण्यात आला.

सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना शनिवार व रविवारी सुट्टी होती. फक्‍त सोमवारी कार्यालये सुरू होती. मात्र, मंगळवारी गुरुनानक यांची जयंती असल्याने पुन्हा सरकारी सुट्टी होती. त्यामुळे सुट्ट्यांचे गणित जुळवत अनेक पर्यटकांनी अलिबागचा रस्ता धरला. त्यामुळे येथील हॉटेल, रिसॉर्टमध्ये पर्यटकांकडून काही दिवसांपूर्वीच आगाऊ नोंदणी करण्यात आली होती. 

अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांनी घोडागाडी, उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी मित्रांसमवेत, तर काही पर्यटकांनी त्यांच्या कुटुंबीयांसमेवत समुद्रकिनारी मौजमजा केली. सुट्टीचा दिवस असल्याने पोलिसांनीदेखील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली होती. 

अलिबाग हे पर्यटनासाठी चांगले शहर आहे. या ठिकाणी सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी वारंवार येत असतो. समुद्रकिनारी स्पीड बोट व अन्य समुद्र खेळांचा आनंद घेता येतो. हा किनारा स्वच्छ व सुंदर असल्याचे पर्यटक सचिन दिसले यांनी सांगितले.
 
पोलिस पथकांसह जीवरक्षक तैनात
अलिबाग, नागाव, किहीम, रेवदंडा, आक्षी अशा अनेक समुद्रकिनारी पोलिस तैनात करण्यात आले होते. अतिउत्साहामध्ये असणाऱ्या पर्यटकांसह महिलांची छेडछाड काढणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. तसेच अलिबाग, नागाव या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते. खोल समुद्रात जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा जीवरक्षकांकडून देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue