खंडाळा घाटात ट्रक उलटला

अपघातग्रस्‍त ट्रक.
अपघातग्रस्‍त ट्रक.

खोपोली : खंडाळा घाटातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. खोपोली एक्‍झिट येथे घाट उतरताना ट्रक उलटल्याची घटना बुधवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडली. या घटनेत ट्रकचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अवधूत देसाई (वय २५, रा. कोल्हापूर), प्रतीक साठे (वय २१, कोल्हापूर), नितीन इंगळे (वय २२) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोरघाट एक्‍स्प्रेस-वेवर खोपोली एक्‍झिट येथून घाट उतरताना तीव्र वळणावर ट्रक सुरक्षा कठडा ओलांडून चढण चढताना उलटला. या घटनेत ट्रकचा समोरील भाग, तसेच कॅबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ट्रकमध्ये चालकसह तीन जण जखमी अवस्थेत अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलिस, रोडवेज पेट्रोलिंग व अपघातग्रस्त मदतीसाठी सामाजिक ग्रुपचे सदस्य हनीफ भाई व अन्य सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

जखमींना ट्रकमधून बाहेर काढून उपचारासाठी प्रथम खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा खंडाळा घाटात कार व जीपमध्ये धडक होऊन दुसरा अपघात घडला असून यात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com