नागोठण्‍यात प्रवाशांचा जीव धोक्‍यात

नागोठणे : अंबा नदीवरील वाकण पुलाचे सिमेंटचे कठडे तुटलेले आहेत.
नागोठणे : अंबा नदीवरील वाकण पुलाचे सिमेंटचे कठडे तुटलेले आहेत.

नागोठणे : मुंबई -गोवा महामार्गावर वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा नागोठण्याजवळील वाकण नाका येथील अंबा नदीवरील जुन्या पुलाचे संरक्षण कठडे तुटले आहेत. याशिवाय पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक पादचाऱ्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा पूल रहदारीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. 

वाकणजवळील अंबा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था बिकट आहे. हा पूल कालबाह्य झाला असून पुलाला आधार देणारे खांबही कमकुवत झाल्याने अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. तसेच सिमेंटच्या कठड्यासह लोखंडी पाईप व संरक्षक कठड्याला गंज पकडल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय आहे.

या पुलावरून गोवा, ठाणे, मुंबई, पुणे मार्गावर जाणाऱ्या तसेच रोहा, महाड, माणगाव येथील औद्योगिक क्षेत्रात विविध कारखान्यांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी वाहनांची दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळेच हा पूल मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.

पावसाळा संपला, तरीही मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते कोलाड मार्गावरील रस्ते कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. सद्यपरिस्थितीत या मार्गावर जे. एम. म्हात्रे कन्स्ट्रक्‍शन व एम. डी. लॅन्डमार्क या कंपन्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या पुलावरून वाहतूक सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.

वाकण पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. पुलावरील काही किरकोळ कामे पूर्ण करून हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
- प्रशांत फेगडे, प्रकल्प संचालक, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com