भरधाव वाहनांना आता लगाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

अलिबाग ः महामार्गावर भरधाव वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महामार्गावर चार आधुनिक पद्धतीची वाहने उपलब्ध झाली आहेत. अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांना रोखण्यासाठी इंटरसेप्‍टर व्हेईकल हे वाहन उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे भरधाव वाहनचालकांना यापुढे लगाम बसणार असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. 

मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अतिवेगात वाहन चालविल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी राज्यामध्ये इंटरसेप्‍टर व्हेईकल वाहने महामार्गावर उपलब्ध झाली आहेत.

रायगड जिल्ह्यातील  मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहने उपलब्ध करण्यात आली असून या वाहनांच्या मदतीने अतिवेगात वाहन चालविणाऱ्यांवर अंकूश ठेवण्यात येणार आहे. 

ऑनलाईन दंडाची आकारणी
इंटरसेप्‍टर व्हेईकल हे वाहन महामार्गावर उभे राहणार आहे. या वाहनामध्ये साडेसात लाख रुपये किमतीची अद्ययावत मशीन आहे. या मशीनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे ठेवण्यात आले असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ८० व १०० पेक्षा अधिक वेगात वाहने चालविणाऱ्या चालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये वाहनाचा वेग व नंबर प्लेट बंदिस्त होणार असून त्याद्वारे वाहनचालकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऑनलाईन दंड आकारण्यात येणार आहे. तसा संदेश चालकाच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue