खालापुरात डम्पर जप्त

खालापूर : नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी डम्‍पर जप्‍त करण्‍यात आले आहे.
खालापूर : नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी डम्‍पर जप्‍त करण्‍यात आले आहे.

खालापूर : सरकारचा महसूल बुडवून राजरोस सुरू असलेल्या गौण खनिजाची अवजड वाहतूक करणाऱ्या चार डम्परचालकांवर खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रमाणापेक्षा जास्त ग्रीट, खडी भरून वाहतूक करणारे डम्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. त्यामुळे डम्पर मालकांची धावाधाव झाली.

राजकीय वजन वापरून पळवाट शोधण्याचा प्रयत्न डम्पर मालकानी केला; परंतु बुडवलेली रॉयल्टी भरा आणि मगच डम्पर घेऊन जा, अशी भूमिका तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी घेतल्याने अखेर गंत्यतर नसल्याने रॉयल्टी भरावी लागली. यापुढेही कारवाई अशीच सुरूच ठेवणार असून सरकारचा महसूल बुडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे तहसीलदार चप्पलवार यांनी इशारा दिला आहे.

रस्त्यावरून अवजड वाहतूक करणारे डम्परवर अनेकदा क्रमांकही स्पष्ट दिसत नाही. परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लघंनही होत असून कारवाईनंतर रात्रीची वाहतूक वाढणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत पाटील यांनी सांगितले.

मध्यंतरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या कामात सतत व्यस्ततेमुळे कारवाई थंडावली होती; परंतु सरकारचा महसूल बुडवून होणाऱ्या वाहतुकीवर यापुढे कारवाई आणखी कठोर केली जाईल.
- इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर तालुका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com