व्यापाऱ्यांची साखळी तोडा!

रोहा : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय यादवराव.
रोहा : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय यादवराव.

रोहा : कोकणातील ८० टक्‍के घरे बंद असतात. २० टक्‍के घरात वयोवृद्ध आजी-आजोबा राहतात. मात्र कोकणातील शेतीत या बंद घरांचे कुलूप उघडण्याची ताकद आहे. विचारपूर्वक केलेली शेती कोकणातील बंद दरवाजाचे कुलूप उघडू शकेल, असे प्रतिपादन समृद्ध कोकण संस्थेचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी रोहा येथे केले. दलालांसह व्यापाऱ्यांची साखळी तोडून शेतातून ग्राहकाच्या घरात कसा माल जाईल याचा विचार केला तर शेतकऱ्याच्या हातात चार पैसे अधिक येतील, असेही त्यांनी सुचविले.

रोहा शेतकरी विकास प्रतिष्ठानच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या वेळी संजय यादवराव म्हणाले, की भातशेतीव्यतिरिक्त इतर पिकांचा विचार करावा लागेल. भाजीपाला, फळबागा अशी वर्षभर बाजार उपलब्ध असलेली पिके घेताना कोणत्या पिकाची कधी काढणी केली म्हणजे भाव चांगला मिळेल याचा विचार केला पाहिजे, असेही त्‍यांनी सुचविले. या वेळी उत्कृष्टपणे शेती करणाऱ्या रोहा तालुक्‍यातील २५ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यक्रमात दुय्यम दर्जा दिला जातो. सार्वजनिक जीवनात राजकारणी आणि व्यापाऱ्यांना नेहमी वरचा दर्जा दिला जातो. मात्र शेतकऱ्यांनी स्वतःला व्यापारी समजून शेती केली तर आर्थिक प्रगती साधण्यास शेतकऱ्याला वेळ लागणार नाही. जसे शेतीचे नियोजन करतो, पाण्याचे नियोजन करतो, तसे आर्थिक नियोजन करणेही आवश्‍यक आहे. मालाचा दर्जा ग्राहकास हवा तसा तयार केला तर भाव आपण सांगू तोच मिळाला पाहिजे. दलाल आणि व्यापारी यांनी आपल्या मालाचा भाव ठरवला तर शेतकरी आर्थिक प्रगती कधीच साधू शकणार नाही, असे मनोगत कृषिकन्या रसिका फाटक यांनी व्यक्त केले.

या वेळी डॉ. राजीव भाटकर, हसनभाई म्हसलाई या मत्स्यतज्ज्ञांनी मत्स्यपालनबाबत; तर पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांनी पशुपालनाबाबत मार्गदर्शन केले. 
या वेळी उद्योजक कृष्णाजी कोबनाक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष अनंत मगर, सचिव गणेश भगत, खजिनदार धनंजय जोशी, संतोष दिवाकर, राकेश लोखंडे, दगडू बामुगडे, मिलिंद म्हात्रे, विजय दिवाकर, खेळू थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कवयित्री संध्या दिवाकर यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com