वस्तीच्या चालक-वाहकांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

महाड तालुका दुर्गम वाडी-वस्त्यात वसलेला आहे. तालुक्‍यातील बहुतांश गावात एसटी सुविधा आहे. यापैकी आजही जवळपास 17 बसेस वसतीच्या जातात. यामध्ये तालुक्‍यातील रामदास पठार, वारंगी, छत्रपती निजामपूर, गोठवली, पदाचा कोंड, गिजेवाडी तसेच हरिहरेश्‍वर या गावांतील वसती बसचा समावेश आहे. यापैकी मोजक्‍या गावांमध्येच शौचालय उपलब्ध असते; मात्र अन्य गावांत गेल्यानंतर एक तर एसटीमध्येच रात्र काढायची अन्यथा मंदिरात झोपण्याची पाळी या कर्मचाऱ्यांवर येते.

महाडः राज्यात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात असले तरी सार्वजनिक शौचालयांअभावी एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना गैरसोईंचा सामना करावा लागतो. 
आजही अनेक गावांतून राज्य एसटी महामंडळाची बस रात्री गावात जाते आणि वस्ती करून दुसऱ्या दिवशी गावातून पुन्हा शहराकडे येते.

ग्रामीण आणि दुर्गम गावात ही सुविधा आजही सुरू आहे. यामुळे सकाळी शहरात येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि कामगारांना याचा फायदा होतो; मात्र वस्तीला गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. ग्रामीण भागात वसतीला जाणारी एसटी बस सायंकाळी महाड आगारातून साधारणपणे 6 ते 7 च्या सुमारास सुटते. यामुळे रात्रीचे जेवण, बिछाना घेऊनच चालक-वाहकांना निघावे लागते. गावात गेल्यानंतर एसटीतच जेवण उरकून एसटीतच झोपावे लागत आहे; मात्र चालक-वाहकांची ही खरी अडचण नसून प्रातर्विधीसाठी ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालये उपलब्ध नसल्याने आजही उघड्यावर जावे लागत आहे.

होंडा ॲक्टिव्हाचा षटकार

महाड तालुका दुर्गम वाडी-वस्त्यात वसलेला आहे. तालुक्‍यातील बहुतांश गावात एसटी सुविधा आहे. यापैकी आजही जवळपास 17 बसेस वसतीच्या जातात. यामध्ये तालुक्‍यातील रामदास पठार, वारंगी, छत्रपती निजामपूर, गोठवली, पदाचा कोंड, गिजेवाडी तसेच हरिहरेश्‍वर या गावांतील वसती बसचा समावेश आहे. यापैकी मोजक्‍या गावांमध्येच शौचालय उपलब्ध असते; मात्र अन्य गावांत गेल्यानंतर एक तर एसटीमध्येच रात्र काढायची अन्यथा मंदिरात झोपण्याची पाळी या कर्मचाऱ्यांवर येते. या दुर्गम गावामध्ये पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्‍याची थंडी असते, अशा कठीण प्रसंगी चालक-वाहक आपली सेवा बजावताना दिसत आहेत. 

ग्रामीण भागात वसतीला जाणाऱ्या एसटी बसमधील चालक-वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील महत्त्वाची समस्या म्हणजे सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसणे. यामुळे ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय उपलब्ध व्हावे. 
- ए. पी. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, महाड 

गावात एसटी बस वस्तीला नेल्यानंतर एखाद्या मंदिरात किंवा एसटीतच रात्र काढावी लागते. सकाळी प्रातर्विधीसाठी मात्र उघड्यावर जावे लागत आहे. याबाबत एसटीने सरपंचांना पत्रव्यवहार केला आहे; मात्र दुर्लक्ष होत आहे. 
- वसंत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष, एसटी कामगार संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue