कर्जतचा चार फाटा कोंडीचा केंद्रबिंदू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

वाहने थांबून राहत असल्याने कर्जत चार फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. एकप्रकारे कर्जत चार फाटा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे.

नेरळः कर्जत तालुक्‍यात मुंबई आणि पुण्यावरून येण्यासाठी सध्यातरी एकच रस्ता अस्तित्वात आहे. कर्जत चार फाटा येथून नेरळ, कल्याण-माथेरानकडे एक रस्ता जातो, तर दुसरा रस्ता कर्जत शहर आणि मुरबाडकडे जातो. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ती लक्षात घेऊन फुकाचे थाटली गेली असून सुट्टीच्या दिवशी तेथे मोठ्या प्रमाणात चहा-नाश्‍ता करण्यासाठी वाहने थांबून राहतात. दरम्यान, वाहने थांबून राहत असल्याने कर्जत चार फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. एकप्रकारे कर्जत चार फाटा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे मुंबई-पुणे प्रवास मंदावला
 
मुंबई आणि पुणे भागातून येणारे पर्यटक सुटीच्या दिवशी कर्जतच्या चारफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. त्यात कर्जत चार फाटा येथून नेरळकडे जाणारा रस्ता 10 मीटर रुंदीचा असून, कर्जत शहराकडे जाणारा आणि चौक मुंबईकडे जाणारा रस्ता हा केवळ साडेपाच मीटर रुंदीचा आहे. त्यात कर्जत चार फाटा ते चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात नाश्‍ता आणि जेवण यांची व्यवस्था असलेले हॉटेल आहेत. त्या रेस्टॉरंटमध्ये काही पदार्थ खाण्यासाठी मुंबईकडून आलेले आपली वाहने बाजूला उभी करून थांबतात आणि त्यानंतर वाहतूक कोंडीला सुरुवात होते. कर्जत चार फाटा येथे शनिवारी सकाळी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. त्याचवेळी सुटीच्या दिवशीही तीच स्थिती असून, कर्जत चार फाटा हे वाहतूक कोंडीचे नित्याचे केंद्र बनले आहे. तेथे उभी राहणारी वाहने पोलिस दलासाठी मोठी धावपळ करणारी बाब असते. 

...तर कोंडी फुटणे शक्‍य 
कर्जत चार फाटा येथून कर्जत शहर आणि मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणारा नवीन पूल लवकरात लवकर निर्माण करण्याची गरज आहे. कर्जत चार फाटा येथून चौक आणि राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारा रस्ता अरुंद असून, कृषी संशोधन केंद्राच्या गेटपर्यंत आलेला दुपदरी रस्ता कर्जत चार फाटा येथे आणण्याची गरज आहे. चार फाटा हा रस्ता आणण्यासाठी केवळ 100 मीटरचा रस्ता करण्याची गरज असून, रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत आहेत. त्यामुळे कोंडी वाढते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-karjat-neral road trafic

टॉपिकस