महाडचे चवदार तळे चमकणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

हरात असलेले ऐतिहासिक चवदार तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक अनुयायी, पर्यटक भेट देत असतात. या तळ्यातील पाणी शेवाळामुळे अनेकदा हिरव्या रंगाचे दिसते. त्यामुळे या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पालिकेने बायो सॅनिटायझेशन ही पद्धत यापूर्वीही अवलंबली आहे.

महाडः शहरातील ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाणी बायो जैव स्वच्छता (बायो सॅनिटायझेशन) पद्धतीने शुद्ध करण्यात येणार आहे. 20 मार्चला चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन असून, तत्पूर्वी चवदार तळ्याच्या कठड्यांची रंगरंगोटी करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या खर्चाला पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. 

नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली महाड पालिकेची सर्वसाधारण सभा काल (ता. 27) पालिका सभागृहात झाली. सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सभेला उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी जीवन पाटील, सर्व सभापती व नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते. शहरात असलेले ऐतिहासिक चवदार तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक अनुयायी, पर्यटक भेट देत असतात. या तळ्यातील पाणी शेवाळामुळे अनेकदा हिरव्या रंगाचे दिसते. त्यामुळे या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पालिकेने बायो सॅनिटायझेशन ही पद्धत यापूर्वीही अवलंबली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा या सगळ्यांचे या पद्धतीने शुद्धीकरण करण्याबाबत सभेत निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीकरता मंजुरी घेण्यात आली.

सिग्नलवरील मुले तयार करणार रोबो

महाड पालिकेच्या या सभेमध्ये चवदार तळ्याच्या बाजूने असणाऱ्या कठड्यांची रंगरंगोटी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 2020 मध्ये जिल्हा नगरोत्थानासाठी कामांची निश्‍चिती करण्यात आली. प्रोत्साहनपर अनुदानांतर्गत पालिकेच्या शौचालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये गटारांची कामे करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या वेळी विरोधी पक्षनेता चेतन पोटफोडे, नगरसेवक दीपक सावंत, शुभांगी शेडगे, सुनील अगरवाल, सायली महता यांनी शहरातील विविध समस्यांबाबत काही मुद्दे उपस्थित केले. 
पालिकेच्या सभेमध्ये छबिना उत्सवानंतर शहरातील साफसफाईची कामे युद्धपातळीवर हाती घेतल्यामुळे सफाई कामगारांचे अभिनंदन करण्यात आले. तसा ठरावही उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी मांडला व तो मंजूरही करण्यात आला. 

पाणीपुरवठा योजना मीटरला मंजुरी 
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाकडे जाणारा रस्ता खराब असल्यामुळे येथे जाण्याकरता अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे कुर्ले धरणाकडे जाणारा रस्ता विकसित केला जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोतुर्डे व एमआयडीसी पाणीपुरवठा व्यवस्थेला बल्क मीटर बसवण्यासाठी सभेत मंजुरी घेण्यात आली. 

कर्मचाऱ्यांना वेळेविषयी सूचना 
नव्या सरकारी नियमानुसार पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाला असून, सुट्टीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याच्या व जाण्याच्या वेळा पाळाव्यात, अशा सूचना बांधकाम सभापती सुनील कविस्कर यांनी या वेळी केल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-mahad-chavdar lake news