आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करणारा अटकेत

आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करणारा अटकेत

अलिबाग :  आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला मांडवा पोलिसांनी बिहार येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार (ता.12) तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बलात्काराची घटना  मांडवा सागरी पोलीस ठाणेच्या हद्दीतील धोकवडे, म्हात्रे फाटा येथील गोयंका बंगला येथे बुधवार (ता. 3) रोजी घडली होती. आदिवासी समाजातील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्यांच्या शेजारी राहणारा 23 वर्षीय आमलेश साह हा आरोपी बिहार येथे पसार झाला होता. या संदर्भात पीडीत मुलीच्या आजीने मांडवा पोलिसात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

मांडवा पोलिसांनी तपासाचे सूत्र जलद गतीने हलवत आरोपीला बिहार येथून त्याच्या नातेवाईकांच्या घरातून शनिवार (ता. 6) रोजी सापळा लावून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर शुक्रवार (ता. 12) पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील अधिक तपास अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम  करीत आहेत.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

raigad marathi crime news Arrested abusing minor girl mumbai breaking updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com