किनारपट्‌टी प्रदूषणमुक्तीसाठी तरुणाची जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

विशाखापट्टणम्‌ ते कर्जत असा तब्बल 1666 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. अक्षय आपल्या विशाखापट्टणम्‌ येथील कार्यालयातून मुंबई म्हणजे पूर्व किनारपट्टी ते पश्‍चिम किनारपट्टी असा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेऊन कर्जतमधून आता मुंबईत पोहचला आहे.

नेरळः समुद्रकिनारा प्रदूषणमुक्तीची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कर्जत तालुक्‍यातील वारे गावातील मूळचा रहिवासी असलेल्या अक्षय हरिचंद्र म्हसे या नौदलामध्ये कार्यरत तरुणाने विशाखापट्टणम्‌ ते कर्जत असा तब्बल 1666 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. अक्षय आपल्या विशाखापट्टणम्‌ येथील कार्यालयातून मुंबई म्हणजे पूर्व किनारपट्टी ते पश्‍चिम किनारपट्टी असा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेऊन कर्जतमधून आता मुंबईत पोहचला आहे. लवकरच तो मुंबई येथील नौदलाच्या मुख्यालयात रुजू होणार आहे.

कोरोनामुळे जग कोमात, भोजपुरी मात्र जोमात
 
हरिचंद्र म्हसे हे कर्जत तालुक्‍यातील आदिवासी भागात असलेल्या वारे गावातील रहिवासी. शेतकरी कुटुंब असलेल्या या म्हसे कुटुंबातील हरिचंद्र म्हसे हे भिवंडी पालिकेमध्ये नोकरीला होते. 2015 मध्ये अक्षय नौदलामध्ये रुजू झाला. त्यानंतर पाच वर्षे विशाखापट्टणम्‌ येथील तळावर अक्षय सेवा बजावत होता. तेथे पाच वर्षांची यशस्वी सेवा करून त्यांची 2020 मध्ये नेव्हीच्या मुंबई येथील मुख्यालयात बदली झाली. त्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीने गेले पाहिजे असा विचार अक्षय याने आपल्या मामाकडे व्यक्त केला. विशाखापट्टणम्‌पासून मुंबई असा एकदातरी सायकल प्रवास करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. या दरम्यान समुद्रकिनारपट्‌टी प्रदूषणापासून वाचवण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला. 

अक्षय यांचे मित्र आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्याने सायकल वरून त्यांची सेवा करीत असलेल्या ठिकाणी विशाखापट्टण ते मुंबई असा प्रवास करण्याचा कार्यक्रम निश्‍चित केला. त्यानंतर अक्षयने 21 फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथून सायकलवरून कर्जत आणि कर्जत येथून मुंबई जाण्याचा प्रवास सुरू केला. या वेळी त्याने नागरिकांशी संवाद साधत किनारपट्‌टी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. 11 दिवसांत तब्बल 1666 किलोमीटर प्रवास सायकलवरून पार करून अक्षय आधी आपल्या कर्जतच्या घरी आणि नंतर आपल्या नवीन कार्यालय असलेल्या नेव्ही डॉकयार्ड येथील कार्यालयात पोहचला आहे. मोहिमेनंतर अक्षयने कर्जत गाठले. कर्जतकरांनी मोठ्या संख्येने त्याच्या आनंदात सहभाग नोंदवत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. 

कोकणाला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे; मात्र अलीकडे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे जलचरांसह त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या मोहिमेदरम्यान अनेकांना किनारपट्‌टीचे प्रदूषणापासून रक्षण करण्याचे आवाहन केले. 
- अक्षय म्हसे, सायकलस्वार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-polution-bycical relly