रायगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांचे लवकरच सुशोभीकरण होणार 

श्रद्धा पेडणेकर - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्राचे वैभव असलेल्या किल्ल्यांच्या सुशोभीकरणाबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एएसआय (आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या सुशोभीकरणात नियमांची चौकट अडचणीची ठरत होती. नुकत्याच झालेल्या करारानुसार किल्ल्यांच्या सौंदर्यीकरणाबाबतच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच किल्ल्यांवर परदेशांप्रमाणे साऊंड ऍण्ड लाईट शो होणार आहेत. 

राज्यातील किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या किल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत आता पहिल्या टप्प्यामध्ये रायगड व त्यानंतर सिंधुदुर्ग या किल्ल्यांचे सुशोभीकरण आणि विकास होणार आहे. इतर राज्ये आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साऊंड ऍण्ड लाईट शोही येथे होणार आहे. या दोन्ही किल्ल्यांसंदर्भातील प्राथमिक प्रस्ताव तयार केला जात आहे आणि तो "एएसआय'च्या अधिकाऱ्यांना पाठवला जाणार आहे. त्यानंतर वास्तूच्या ऐतिहासिक संदर्भाला कोणताही धक्का न लावता सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यातून "किल्ले पर्यटना'ला चालना देण्यात येणार आहे. 
 
सौरदिव्यांनी उजळणार रायगड 
रायगड किल्ल्याचा पायथा ते किल्ल्यापर्यंतच्या पायवाटेच्या अनेक पायऱ्यांची पडझड झाली आहे. त्यांची दुरुस्ती आणि रायगडावर "नाईट ट्रेक'ला जाणाऱ्यांची संख्या पाहता, पायवाटेवर सौरदिवे बसवण्यात येणार आहेत. तसेच ठिकठिकाणी बसण्यासाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. जिजाऊ वाड्याजवळ पर्यटन केंद्र तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातही पायवाटा, बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

Web Title: Raigad, Sindhudurg fort will soon beautification