रायगडमध्ये चार विद्यमान आमदार पिछाडीवर Election Result 2019 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण मतदारसंघात भाजपचे रवीशेठ पाटील नवव्या फेरीअखेर 16 हजार 103 मतांनी आघाडीवर आहेत. येथे शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील पिछाडीवर आहेत. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आठव्या फेरीअखेर 12 हजार 977 मतांनी आघाडीवर असून येथे शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर आहेत. महाड मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले बाराव्या फेरीअखेर 10 हजार 021 आघाडीवर आहेत. तर कॉंग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप पिछाडीवर आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण मतदारसंघात भाजपचे रवीशेठ पाटील नवव्या फेरीअखेर 16 हजार 103 मतांनी आघाडीवर आहेत. येथे शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील पिछाडीवर आहेत. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आठव्या फेरीअखेर 12 हजार 977 मतांनी आघाडीवर असून येथे शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर आहेत. महाड मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले बाराव्या फेरीअखेर 10 हजार 021 आघाडीवर आहेत. तर कॉंग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप पिछाडीवर आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड पिछाडीवर असून येथे शिवसेनेचे महेंद्र थोरवे आठव्या फेरीअखेर 6 हजार 027 मतांनी आघाडीवर आहेत. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी दहाव्या फेरीअखेर 13 हजार 527 मतांनी आघाडीवर आहेत. तर शेकापचे विद्यमान आमदार पंडित पाटील पिछाडीवर आहेत. पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर 32 हजार 169 मतांनी आघाडीवर आहेत. तसेच उरणमध्ये विद्यमान आमदार मनोहर भोईर पिछाडीवर असून येथे महेश बालदी 2 हजार 672 मतांनी आघाडीवर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RAIGAD UPDATE