शेकापला भोपळा? ElectionResult 2019

नीलेश पाटील : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अलिबाग : विधानसभा निवडणुकीत रायगडमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे चारही उमेदवार पिछाडीवर असल्याने या पक्षाला जिल्‍ह्यात भोपळाही फोडताही येणार नाही, अशी शक्‍यता आहे. एकेकाळी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शेकापची गेल्या काही वर्षांत पिछेहाट होत आहे. 2014 मध्‍ये निवडणुकीत पंढरपूर जिल्‍ह्यातील सांगोला मतदारसंघातील या पक्षाचे गणपतराव देशमुख विजयी झाले होते. या वेळी देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख हे पिछाडीवर आहेत. तर रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये धैर्यशील पाटील आणि अलिबागमधून पंडित पाटील विजयी झाले होते. या वेळी हे दोघेही निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, ते त्यांच्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. तर उरणमधून त्यांच्या पक्षाचे विवेक पाटील आणि पनवेलमधील हरेश केणी हे सुद्धा पिछाडीवर आहेत. त्यामुळे शेकापला जिल्ह्यात भोपळाही फोडता येणार नाही, असेच दुपारी 12. 45 पर्यंत चित्र होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RAIGAD UPDATE