रायगडचे सहा पोलिस अधिकारी सेवानिवृत्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

रायगड जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षकांसह सहा पोलिस अधिकारी व कर्मचारी जुलैमध्ये सेवानिवृत्त झाले.

मुंबई : रायगड जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षकांसह सहा पोलिस अधिकारी व कर्मचारी जुलैमध्ये सेवानिवृत्त झाले. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

पोलिस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक विजय पांढरपट्टे, महाड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक नंदाजी भोईर, नियंत्रण कक्षातील पोलिस उपनिरीक्षक अनिल साळुंखे, पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार चंद्रकांत कळमकर, नेरळ पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार प्रमोद नलावडे, गोरेगाव पोलिस ठाण्यातील भीमराव जाधव यांनी रायगड पोलिस दलात वेगवेगळ्या पदावर काम केले. 

कामगिरीबद्दल कौतुक
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याकडे प्रशासनाने नेहमीच प्राधान्याने लक्ष दिले. तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यांची पोलिसांनी यशस्‍वीपणे उकल केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस दलाकडून त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे. अलिबागमधील पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ अपर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad's Six police officer has retired, Mumbai