रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

नेरळमध्ये राहणाऱ्या तरुणाला मध्य रेल्वेत क्‍लार्कची नोकरी देण्याच्या प्रलोभनाने तब्बल सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

नेरळ : नेरळमध्ये राहणाऱ्या तरुणाला मध्य रेल्वेत क्‍लार्कची नोकरी देण्याच्या प्रलोभनाने तब्बल सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

मोडकनगर येथे राहणारे दीपक मधुकर मोडक यांचा मुलगा दर्शन याला रेल्वेत नोकरी देतो, असे सांगत तिघे जण त्यांच्याकडे आले. रेल्वेत क्‍लार्कची नोकरी हवी असेल सात लाख द्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले. नोकरी न मिळाल्यास व्याजासह 10 लाख परत देऊ, असे आश्‍वासन दिले. त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन दीपक मोडक यांनी सात लाख टप्प्याटप्प्यांत दिले. विदेश गंगाण्णा शिंदे, सोमन के. शंकरन, विश्रांती कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. 

हे तिघेही पैसे घेऊन पसार झाले. त्यांचा तपास मोडक यांनी लावला आणि रक्कम परत मागितली. त्या वेळी तिघांनीही सात लाखांचे धनादेश दिले; मात्र ते वटले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नेरळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Rail Job Fake Commitment