रेल्वे तिकीट कन्फर्म नाही, घाबरु नका; रेल्वे तिकीटाच्या दरात करता येईल विमान प्रवास

विनोद राऊत
Wednesday, 23 September 2020

रेल्वेची तिकिटं बूक केली, प्रवासाची पुर्ण तयारी केली, मात्र क्षणी तिकीट कन्फर्म झाले नाही. आता घाबरू नका, तूम्हाला नियोजीत प्रवास रद्द करण्याची गरज नाही

मुंबई : तूम्ही रेल्वेची तिकिटं बूक केली, प्रवासाची पुर्ण तयारी केली, मात्र क्षणी तिकीट कन्फर्म झाले नाही. आता घाबरू नका, तूम्हाला नियोजीत प्रवास रद्द करण्याची गरज नाही. रेल्वे तिकीटाच्या किमतीत तूम्हाला विमान प्रवास करता येणे शक्य आहे. होय, रेलोफाय ही कंपनी तूमच्या प्रवासाची काळजी घेण्यास सज्ज झाली आहे. वेटींग तिकीट असलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याची हमी देणारी, देशातील पहिली अनोखी सेवा या स्टार्ट अप कंपनीने सुरु केली आहे. 

प्रवासाचे दर अवाक्यात असल्यामुळे, रेल्वे प्रवासाला अनेकांची पहिली पसंती असते. परिणामी सर्वांची तिकीटे कन्फर्म होत नाही. अशा वेळी रेलॉफी कंपनी तिकीट कन्फर्म न झालेल्या प्रवाशाच्या पुढच्या प्रवासाची हमी घेते. तूम्हाला फक्त काही शुल्क मोजून या कंपनीच्या मोबाईल ऍप्लिकेशनवरून किंवा वेबसाईटवरुन तूमच्या पीएनआर नंबरची नोंदणी करावी लागते. त्यानंतर तूमच्या पीएनआर नंबर ट्रॅक करण्याची जबाबदारी ‘रेलोफाय’ ही  कंपनी घेते. संबधीत प्रवाशाची तिकीट कन्फर्म झाली नसल्यास, अगदी अंतिम क्षणाला ही कंपनी तूम्हाला विमानाची तिकीटे उपलब्ध करुन देते. आणि तीही तूमच्या रेल्वे तिकीटाच्या दरात.

महत्त्वाची बातमी : तारीख होती २३ सप्टेंबर १९८१; तब्बल ३९ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला झालेला धुवाधार तुफानी पाऊस

कशी सेवा मिळते 

- रेल्वे तिकीट बूक केल्यानंतर पीएनआर नंबर मोबाईल ऍप्लिकेशनवर रजिस्टर करावा लागतो 
- वेटींग लिस्टमधील नंबरप्रमाणे तूम्हाला नोंदणी शुल्क भरावे लागले 
- 50 रुपये ते 1 हजार रुपयापर्यंत नोंदणी शुल्क 
- वेटींग लिस्ट क्रमांक कमी तर नोंदणी शुल्क कमी 
- नोंदणीनंतर तूमच्या प्रवासाची हमी ही कंपनी घेते 
- वेटींगलिस्ट कन्फर्म न झाल्यास  रेल्वे तिकीटाच्या किमतीने विमान प्रवास 
- सरासरी रेल्वे एसी-3 च्या दरात विमान तिकीटे मिळतात
- जेवढ्या अगोदर तूम्ही नोंदणी कराल, तेवढे स्वस्त विमान तिकीट
- मात्र कुठल्याही स्थितीत मार्केट दराच्या 50 टक्के किमतीत विमान तिकीट मिळणार

( वरील दावा कंपनी करतेय )

( संकलन - सुमित बागुल )

railofy startup who gives air tickets if your train ticket is not confirm

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railofy startup who gives air tickets if your train ticket is not confirm