रेल्वे कर्मचाऱ्यांना कवच

संतोष मोरे
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - रुळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांचा अनेकदा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांना आळा बसावा, यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुळावर काम करणाऱ्या सर्व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना रेट्रोरेफ्लेक्‍टिव्ह जॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर मार्गे निघालेल्या हावडा-मुंबई मेलमध्ये वर्धा ते बडनेरा सेक्‍शनमध्ये गाडीच्या इंजिनमधून धूर दिसू लागला. इंजिनमधून धूर निघत असल्याने सहायक इंजिनचालक एस. के. विश्वकर्मा इंजिनचे निरीक्षण करताना खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा चव्हाट्यावर आला. या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेट्रोरेफ्लेक्‍टिव्ह जॅकेट पुरवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. अशा प्रकारचे जॅकेट रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. प्रथम या जॅकेटचा प्रस्ताव रुळावर काम करणाऱ्या सर्व अभियंते, तांत्रिक कामगार, कर्मचाऱ्यांसाठी तयार केला आहे. 

प्रकाश परावर्तन क्षमता
रेट्रोरेफ्लेक्‍टिव्ह जॅकेटमध्ये प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता असते. रुळावर काम करताना गाडी क्रॉसिंग करून कोणत्या रुळावरून जाईल याची माहिती नसते, त्यामुळे तेथे काम करणारा र्मचारी अस्वस्थ होतो. अशा वेळी जॅकेट असल्यास अंधाराच्या वेळी त्याचे प्रकाशमान मोटरमनला स्पष्ट दिसेल.

रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेट्रोरेफ्लेक्‍टिव्ह जॅकेट पुरवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने तत्त्वत: घेतला आहे.
- व्ही. ए. मालेगावकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

Web Title: railway employee security retro reflective jacket