रविवारी कामानिमित्त बाहेर पडताय. मग हे वाचाचं.

file photo
file photo

मुंबई : उपनगरी रेल्वेवरील तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 4) मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जलद मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल. पश्‍चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. 

मध्य रेल्वे 
मुख्य मार्ग 
कुठे : कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान "अप' जलद मार्गावर. 
कधी : सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत. 
परिणाम : या स्थानकांदरम्यान "अप' जलद लोकल धीम्या मार्गावरून. लोकल आणि मेल-एक्‍स्प्रेस 20 ते 25 मिनिटे उशिराने. 

हार्बर मार्ग 
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर. 
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत. 
परिणाम : वाशी-बेलापूर-पनवेल ते सीएसएमटी आणि वडाळा रोड; सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेल आणि गोरेगाव-वांद्रे या मार्गांवरील लोकल वाहतूक बंद. प्रवाशांच्या सोईसाठी कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल. 

पश्‍चिम रेल्वे 
कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' आणि "डाऊन' धीम्या मार्गावर. 
कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत. 
परिणाम : या स्थानकांदरम्यान "अप' आणि "डाऊन' धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून. विलेपार्ले स्थानकातील कमी लांबीच्या फलाट क्रमांक 5/6 वर लोकलना दोन वेळा थांबा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com