Mumbai News : मध्य रेल्वेने हरविलेल्या १३९९ मुलांची केली घरवापसी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Police frontline railways rescued 1399 children under Operation Nanhe Ferishte mumbai

Mumbai News : मध्य रेल्वेने हरविलेल्या १३९९ मुलांची केली घरवापसी!

मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वेच्या समन्वयाने ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत गेल्या दहा महिन्यात १३९९ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ९४९ मुले आणि ४५० मुलींचा समावेश आहे.

या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत हरवलेल्या / घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे.

देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात.

प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत आरपीएफ पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवरील १ हजार ३९९ मुलांची सुटका केली आहे.

कोणत्या भागात किती मुले घरी परतली

- मुंबई विभाग- ६१५ मुले (४४१ मुले आणि १७४ मुली).

- भुसावळ विभाग -२८४ मुले (१५० मुले आणि १३४ मुली).

- पुणे विभाग- २८५ मुले (२३३ मुले आणि ५२ मुली).

-नागपूर विभाग १५७ मुले (८९ मुले आणि ६८ मुली).

- सोलापूर विभाग ५८ मुले (३६ मुले आणि २२ मुली).

मध्य रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेल्या मुलांशी संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबासोबत जाण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक जबाबदारीची भूमिका पार पाडत आहे. आरपीएफ आणि फ्रंटलाईन कर्मचारी प्रकरणातील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कारवाई करतात.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे