मुंबई: माटुंगा-सायन दरम्यान रुळाला तडा

Mumbai
Mumbai

मुंबई : माटुंगा ते सायन दरम्यान सकाळी 8.50 वाजता धीम्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने, कामावर पोहचणार्या रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर 9.10 वाजेपर्यंत रुळाचे काम पूर्ण करण्यात आले.दरम्यान काही लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून, काही लोकल रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धीम्या मार्गावरील रुळाला हा तडा गेला. त्यामुळे धीम्या लाईनवरील गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे 20 मिनिटाने उशिरा सुरू असून याचा परिणाम दिवसभराच्या वेळापत्रकावर पडण्याची शक्यता आहे. 

लोकल उशिरा धावत असल्याने आणि गाड्यांमधील गर्दी वाढत आहे. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेने रुळ दुरुस्तीचे काम सुरू केले असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com