पालघर येथे मोठी रेल्वे दुर्घटना टाळली

नीरज राऊत
बुधवार, 25 जुलै 2018

पालघर रेल्वे स्थानकाच्या अप (मुंबई च्या दिशेने) दक्षिणेच्या बाजूला कामावरून परतणार आकाश बाळकृष्ण पटेकर यांनी रात्री आठच्या सुमारास रुळाला तडा गेल्याचे पाहिले. क्षणात कोणताही विचार न करता त्यांनी पोलिस आणि स्टेशन मास्टर यांना तातडीने या संबंधित सूचित केले. या मुळे या मार्गावरील वाहतूक तातडीने थांबविण्यात आली.

पालघर : कामावरून घरी परतणाऱ्या एका युवकाने पालघर रेल्वे स्टेशनच्या लगत रेल्वे रुळ तुटल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरिय क्षेत्रात एक मोठा अपघात टळला.

पालघर रेल्वे स्थानकाच्या अप (मुंबई च्या दिशेने) दक्षिणेच्या बाजूला कामावरून परतणार आकाश बाळकृष्ण पटेकर यांनी रात्री आठच्या सुमारास रुळाला तडा गेल्याचे पाहिले. क्षणात कोणताही विचार न करता त्यांनी पोलिस आणि स्टेशन मास्टर यांना तातडीने या संबंधित सूचित केले. या मुळे या मार्गावरील वाहतूक तातडीने थांबविण्यात आली.

19 वर्षीय, 10 वी उत्तीर्ण असलेला आकाश हा केळवे रोड झान्जरोळी येथील रहिवासी असून तो पालघर येथील शोले आयपीएन या कंपनीमध्ये कामला आहे. रेल्वे ट्रक ओलांडताना रुळला तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने विरारच्या दिशेने धावणारी लोकल गाडी काही काळ पालघर येथे थांबवून ठेवण्यात आली. तडा गेलेल्या रुळची दुरुस्ती केल्यानंतर धीम्या गतीने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. या सुमारास मुंबईकडे अनेक जलद गाड्या धावत असतात, मात्र आकाशच्या समयसूचकता आणि तत्परतेमुळे पश्चिम उपनगरातील एक मोठी दुर्घटना टाळली.

Web Title: railway track damage in Palghar