पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेत सौर उर्जेचा वापर; पुढील दहा वर्षात रेल्वेला करणार कार्बन मुक्त..   

प्रशांत कांबळे 
Tuesday, 14 July 2020

पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने सौर उर्जैचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोणावळा खंडाळा घाटात आणि रेल्वे स्थानकांच्या छतावर सौर उर्जाचे प्रकल्प लावून, 2030 पर्यंत स्वतला कार्बन मुक्त करण्याचे धेय्य मध्य रेल्वेने आखले आहे.

मुंबई: पर्यावरण रक्षणासाठी रेल्वेने सौर उर्जैचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोणावळा खंडाळा घाटात आणि रेल्वे स्थानकांच्या छतावर सौर उर्जाचे प्रकल्प लावून, 2030 पर्यंत स्वतला कार्बन मुक्त करण्याचे धेय्य मध्य रेल्वेने आखले आहे. या प्रयोगामूळे रेल्वेला लाखो रुपयांचा विद्युत खर्चाची बचत करता येणार आहे. 

रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 च्या काळात आर्थीक काटकसर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वात मोठी बतच विद्यूत खर्चावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे मध्य रेल्वेने आता पर्यावरण रक्षणासाठी सौर उर्जैचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. लोणावळा आणि खंडाळा घाट आणि त्यालगत असलेल्या रेल्वे परिसर पूर्णपणे स्वच्छ करून सौर उर्जैवर चावण्यात येणार आहे. 

हेही वाचा: लॉकडाऊनआधी वेतन न मिळणाऱ्या कामगारांना सरकारचा निर्णय गैरलागू:  हायकोर्टचा महत्वपूर्ण निर्णय

त्यासाठी मध्य रेल्वेने हरित उर्जा उत्पादन आणि दरवर्षी लाखो रुपयांच्या वीज बिलात बचतीसह ग्लोबल वाॅर्मिंग कमी करण्यासाठी आणि हवामान बदलांच्या विरूद्ध लढा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे हरित उपक्रम हाती घेतले आहेत.  

मध्य रेल्वेने स्टेशन लाईटिंग व्यतिरिक्त सोलर पॅनेल्स, सौर झाडे आणि सौर वॉटर कूलर देखील स्थापित केले आहेत. लोणावळा रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 2,3 वरील छतावर 76 किलोवॅट उर्जा निर्मितीसाठी सौर पॅनेल्स स्थापित केले आहेत. सौर पॅनेल्समधून वर्षाकाठी 68,400 किलोवॅट तास क्षमतेची उर्जा उत्पन्नामूळे रेल्वे स्टेशनच्या वीजबिलात बचत होणार आहे. 

लोणावळा स्टेशनच्या बाजाराच्या दिशेने बागेची रोषणाई करण्यासाठी दोन सुंदर सौर झाडे वॅट एलईडी फिटिंग्जसह 40 वॅट  सौर पॅनेल्सने एकत्रित करून उभारण्यात आल्या आहेत.  लोणावळ्यातील प्रवाशांच्या दृष्टीने ही एक वैशिष्ट्यपूर्ण  गोष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. तर लोणावळा स्थानकात एक सौरऊर्जेवर चालणारे वॉटर कूलर देखील देण्यात आले आहे.
 
बीव्हीटी यार्डातील लोको पायलट, गार्ड रनिंग रूमच्या प्रवेशासाठी 33 वॅटचे सहा आउटडोर इंटिग्रेटेड टाइप सोलर स्ट्रीट पोल दिले आहेत. लोणावळा येथील बीव्हीटी यार्डमध्ये, ग्रीन गँगहट तयार केली आहे. यामध्ये 1 किलोवॅटचे  छतावरील स्टोरेज सारखे सौर  पॅनेल्ससह दोन 160 एएच बॅटरी आणि 1 केव्हीए इन्व्हर्टर देण्यात आले आहेत. खंडाळा स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 30 येथे 1 किलोवॅटचे  छतावरील स्टोरेज सारखे सौर पॅनेल्ससह दोन 160 एएच बॅटरी आणि 1 केव्हीए इन्व्हर्टरसह  देण्यात आली  आहे.  

हेही वाचा: मनसेनं गूगलला पत्र पाठवून केली 'ही' महत्वाची मागणी..वाचा सविस्तर बातमी  

चेंबूर रेल्वे स्टेशन येथे 60 केडब्ल्यूपी ज्यामधून 54000 किलोवॅट तास वार्षिक वीज निर्मिती होणार असून, डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन 30 केडब्ल्यूपी ज्यामधून 27000 किलोवॅट तास, आसनगाव रेल्वे स्टेशन 16.3 किलोवॅट ज्यामधून 14670 किलोवॅट तास, आपटा स्टेशन 5 केडब्ल्यूपी ज्यामधून 4500 किलोवॅट तास, पेण स्टेशन येथे 6.3 किलोवॅट आणि 5 केडब्ल्यूपी सौर पॅनेल 10470 किलोवॅटतास, रोहा स्टेशन येथे 18.2 किलोवॅट 16200 किलोवॅटतास वार्षिक वीज निर्मितीसाठी रूफटॉप ग्रीड कनेक्ट सोलर पॅनल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

railway using solar energy for protection of environment 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway using solar energy for protection of environment