रविवारहीही भक्तांना "प्रसाद'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मुंबई: गौरी विसर्जनाला आवर्जून हजेरी लावणाऱ्या वरुणराजाने सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देतानाही रविवारी (ता. 8) सायंकाळी आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे सात दिवसांच्या गणपतीला निरोप देणाऱ्या गणेशभक्तांनाही भिजण्याचा "प्रसाद' मिळाला. मंगळवारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार सरी बरसतील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे; मात्र सोमवारी मुंबई वगळता संपूर्ण कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

रविवारी दिवसभरात संततधार; तर मधूनच काही वेळेसाठी थांबून, सायंकाळनंतर अचानक पावसाने जोर धरला होता. सुरुवातीला सकाळी पावसाचा जोर दिसून आल्याने गौरी विसर्जनाप्रमाणेच भिजवणार की काय, असा प्रश्‍न मुंबईकरांना पडला होता. पण, सकाळी 11 नंतर पावसाने विश्रांती घेतली. सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सांताक्रूझ केंद्रात फक्त सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. सायंकाळी साडेपाच वाजता सांताक्रूझ येथे 21 मि.मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमान 29.1 अंश सेल्सिअसवर कायम असताना किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

डहाणूत तीन मि.मी.चीच नोंद 
उर्वरित कोकण पट्ट्यात पावसाचा फारसा जोर दिसून आला नाही. सायंकाळी साडेपाचच्या नोंदीनुसार डहाणूत केवळ तीन मिलिमीटर; तर रत्नागिरीत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain contenue in mumbai at sunday