मुंबईसाठी पुढील 48 तास धोक्याचे; धुंवाधार पावसाचा इशारा

मुंबईसाठी पुढील 48 तास धोक्याचे; धुंवाधार पावसाचा इशारा

मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस (heavy rain fall) कोसळत आहे. सकाळपासून मुंबईतील पावसाचा जोर आधिकच वाढला आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील 48 तास पावसाच्या सरी अधिक तीव्रतेने बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरासाठी रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय. मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. विलेपार्ले, सायन, मुलुंड, नालासोपारा, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम, हिंदमाता आणि दादर या भागात सकल भागात पाणी साठलं आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या सर्व परिसरामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.

नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.

पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. रायगड आणि रत्नागिरीला शनिवारी आणि रविवार रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवसांमध्ये पावसाची तीव्रता आधिक वाढेल, त्यामुल आवशकता नसल्यास घराबाहेर पडून नका, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com