...आणि पाऊस पडलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

रायगड जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनी धसका घेतला होता. परंतु आज सकाळपासून पावसाने उघडीप घेतल्याने दिलासा मिळाला. 

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्याचे विघ्न प्रचारातही होते. त्यावर मात करत काही उमेदवारांनी प्रचार केला होता. त्यातच हवामान विभागाने काल २४ तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज काल वर्तवल्याने उमेदवार चिंतेत होते. निवडणूक यंत्रणेचीही तारांबळ उडाली होती. 

रिमझिम पावसामुळे त्यांना मतदान साहित्य केंद्रांवर पोहोचवण्यास विलंब झाला होता.
पावसाच्या शक्‍यतेमुळे मतदान केंद्रांवर आयोगाच्या वतीने उपाययोजना केल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain has not came