श्रीवर्धनमध्ये पावसाचा कहर 

पाऊस
पाऊस


मुंबई ः रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्‍यात वादळी पावसामुळे वेळास-आदगाव रस्त्यावर आज झाड कोसळले. बोर्लीपंचतन येथील जिल्हा परिषद शाळेवर वृक्ष कोसळल्याची घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या मुसळधार पावसामुळे बोर्लीपंचतन बसस्थानक आवारात पाण्याचे डबके तयार झाले आहे. तालुक्‍यात पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे.

आदगाव मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक काळ खोळंबली होती. बोर्लीपंचतन व सर्वे, दिघीकडे जाणाऱ्या वाहनांनी लगतच्या कच्च्या रस्त्याचा वापर करत वाहने काढली. बोर्लीपंचतन येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे मुलांना खाऊ देण्यात येणाऱ्या पोषण आहार खोलीचे वृक्ष कोसळल्यामुळे पत्रे तुटल्याने अनेक खाद्य वस्तूचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने अनेक सकल भागात पाणी साचले होते. बोर्लीपंचतन येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणारा बसस्थानक रस्त्यात पाण्याचे डबके तयार झाले असून, यातून मार्ग काढणे संतापजनक ठरत आहे. सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला मोठे खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचल्याने या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची त्वरित दखल घेण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com