'वायू'मुळे मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी

'वायू'मुळे मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी

मुंबई : अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या वायू तीव्र चक्रीवादळामुळे बुधवारी मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाची हजेरी लागली. उद्या (गुरुवार) सकाळी वायू गुजरातपट्टीवर वेरावळ आणि मेहूआदरम्यान धडकेल. याचा थोडाफार प्रभाव पालघरमध्ये जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडेल. सोसाट्याचा वाराही जास्त दिसून येईल. बुधवारी मध्यरात्री रत्नागिरी किनारपट्टीनजीकच्या खोल समुद्रात सकाळी साडेपाचदरम्यान वायू चक्रीवादळाची तीव्रता वाढली. परिणामी दक्षिण कोकणात मान्सूनपूर्व पावसाचा जोर जास्त दिसून आला. मुंबईत मात्र दिवसभर हलक्‍या सरींसह संततधार पावसाची हजेरी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com