मुंबईत पावसाची जुलैत अर्धी मजल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - पावसाने यंदा मुंबईवर महाकृपा केली आहे. जुलैचा पहिला पंधरवडा संपण्याच्या आतच सरासरीच्या 50 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला आहे. विहार आणि तुळशी धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा जास्त पाणी या काळात मुंबईतून समुद्रात सोडण्यात आले.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यावर 10 जुलैपर्यंत सरासरी 28 ते 30 टक्के पाऊस होतो. या कालावधीत यंदा 54 टक्के पाऊस झाल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. 4 जूनला पावसाला सुरवात झाल्यावर मधले काही दिवस कोरडे गेले. हे लक्षात घेता अवघ्या 20 दिवसांत इतका पाऊस झाला आहे. मॉन्सूनचे पॅटर्न बदलल्याने कमी काळात जास्त पाऊस पडत असल्याचे निरीक्षण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले.

कुलाबा येथे गेल्या वर्षी या तारखेपर्यंत 27.24 टक्के पाऊस झाला होता, तर यंदा 53.27 टक्के झाला आहे. सांताक्रुझ येथे गेल्या वर्षी 29.02 टक्के, तर यंदा 54.19 टक्के पाऊस झाला आहे.

पावसाचे पॅटर्न बदलले आहेत. कमी काळात जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा आता स्थानिक पातळीवर करण्यास सुरवात केली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत आहे. निचरा वेगाने होऊ लागला आहे.
- अजोय मेहता, महापालिका आयुक्त

Web Title: rain in mumbai water