सफाळयात पावसाचा तडाखा; वाहतूक ठप्प

प्रमोद पाटील 
रविवार, 8 जुलै 2018

शनिवार असल्याने शाळा असल्याने शाळा लवकर सुटली होती. त्यामुळे या दोन्ही घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. स्थानिक पातळीवर झाडे बाजुला करुन रस्ता मोकळा करण्यात आला.

सफाळे : पालघर जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सफाळे- दातीवरे रस्त्यावर आगरवाडी आणि चटाळे या दोन ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने शनिवारी (ता.7) दुपार पर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. तर चिखलपाडा येथील मराठी शाळेच्या छतावर चिंचेचे झाड पडले. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. 

शनिवारी सकाळ पासून या परिसरात मुसळधार पावसा बरोबरच सोसायटयाचा वारा सुटला होता. सकाळी नऊच्या सुमारास आगरवाडी आणि चटाळे येथील रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच चिखल पाडा येथील मराठी शाळेच्या छतावर चिंचेचे झाड पडले. शनिवार असल्याने शाळा असल्याने शाळा लवकर सुटली होती. त्यामुळे या दोन्ही घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. स्थानिक पातळीवर झाडे बाजुला करुन रस्ता मोकळा करण्यात आला.

तसेच या भागात बरयाच ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. तर वीजेच्या तारा खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आहे. प्रशासनाने वीजेच्या खांबांबरोबरच ठिक ठिकाणी झाडांच्या फांदया बाजुला करणे आवश्यक आहे असे येथील लोकांचे म्हणणे आहे. दुपार नंतर पावसाने उघाड दिल्याने वाहतूक व्यवस्था सुरू झाली. 

Web Title: rain in saphala