दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - मॉन्सून दक्षिण अंदमानमध्ये दाखल झाल्याची सुवार्ता असतानाच आज सकाळी दक्षिण मुंबईत पावसाच्या हलक्‍या सरींचा वर्षाव झाला. शहरात उद्याही रिमझिम पावसाची शक्‍यता असून, मालवण ते वसईदरम्यान मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. परळ ते कफ परेड परिसरात सकाळी 7 ते 9च्या दरम्यान हलक्‍या सरी कोसळल्या. त्यानंतर सायंकाळपर्यंत आकाश ढगाळ होते. मेकुणू या अतितीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळेच मुंबई किनारपट्टीलगतच्या वातावरणात बदल झाल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मेकुणूची तीव्रता वाढली असून, त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: rain in south mumbai