ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

ठाणे - ठाणे जिल्ह्यालाही सोमवारी पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भाग जलमय झाले होते. त्यामुळे नागरिकांचे व्यवहार काही प्रमाणात विस्कळीत झाले. रात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण पावसामुळे लोकल उशिराने धावत असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. 

जिल्ह्यात शनिवारपासून सरींवर कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी जोरदार बॅटिंग केली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर सारख्या शहरी भागांसह शहापूर, कल्याणच्या ग्रामीण भागांतही दणका दिला. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले होते. कळवा, मुंब्रा, दिवा भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सोमवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 50मिमी पाऊस पडला. ठाणे शहरात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 112 मि.मी पावसाची नोंद झाली. 

Web Title: rain in thane district