भिवंडी - वाडा मार्गावर साचले पाणी, वाहतूक ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

वाडा : भिवंडी - वाडा महामार्गावरील लखमापूर फाट्याजवळ महामार्गावर पाणी साचल्याने आज सकाळपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कंबरभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.  

भिवंडी - वाडा - मनोर या रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याने नागरिक ठेकेदार सुप्रिम कंपनी व त्यावर देखरेख ठेवणारे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.  

कंबरभर पाण्यातून वाहने टाकत असल्याने वाहनांचेही नुकसान होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करीत आहेत. 

Web Title: rain water on bhiwandi wada highway traffic jam