लोकशाहीच्या उत्सवावर पावसाचे सावट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या भीतीने उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या भीतीने उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदान होईल, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे; मात्र कमी मतदान झाल्यास त्याचा उमेदवारांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

राज्यासह ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघाकरिता सोमवारी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी दोन्ही विभागांमधील तयारी पूर्ण झाली. दोन्ही मतदारसंघांची मतदान संख्या पाहता तब्बल ९ लाख ४१ हजार मतदार हक्क बजावणार आहेत; परंतु यंदाच्या वर्षी मतदानाच्या दिवशी तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवला जात असल्याने उमेदवारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाचे सावट असल्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान केंद्रावरच जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला; मात्र मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी आवाहनाव्यतिरीक्त दुसरे साधन प्रशासनाकडे नसल्यामुळे मतदारांची प्रतीक्षा करण्यापलिकडे दुसरा मार्ग नाही. २०१४ च्या निवडणुकीत दिवाळी सुट्टी नव्हती. तसेच साधारण वातावरण असतानाही बेलापूर मतदारसंघात केवळ ४९ टक्के मतदान झाले होते. ऐरोलीत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. 

पावसाची शक्‍यता असली तरी मतदारांसाठी रेनप्रुफ मंडप तयार केले आहेत. पाणी साठल्यास मतदारांना चालण्यासाठी लाकडी प्लॅटफॉर्म तयार केले असून, मतदान केंद्रांबाहेर रेती व खडी टाकली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे.  
- ज्ञानेश्‍वर खुटवड, निवडणूक निर्णय अधिकारी, बेलापूर. 

एकूण मतदार - 
९ लाख ४१ हजार २५१
एकूण मतदार केंद्रे - ८२६ 
 संवेदनशील केंद्रे - ७१
 स्त्री - ३ लाख ६७ हजार ३८८
 पुरुष - ४ लाख ६९ हजार ८२७ 
 कर्मचारी -४५००
 पोलिस फौजफाटा - ५०००

२०१४ ची आकडेवारी
२०१४ च्या निवडणुकीत दिवाळी सुट्टी नव्हती. तसेच साधारण वातावरण असतानाही बेलापूर मतदारसंघात केवळ ४९ टक्के मतदान झाले होते. ऐरोलीत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. 

ऐरोली उमेदवार
- गणेश नाईक, भाजप-शिवसेना महायुती 
- गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
- नीलेश बाणखेले, मनसे
- डॉ. प्रकाश ढोकणे, वंचित बहुजन आघाडी.

बेलापूर उमेदवार
- मंदा म्हात्रे, भाजप-शिवसेना महायुती.
- अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी 
- गजानन काळे, मनसे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall on the feast of democracy