शेवटच्या दिवसाच्या प्रचारावर पावसाचे सावट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केली होती मात्र शनिवारी चेंबूर परिसरात  सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केल्याने याचा परिणाम प्रचारावर पाहायला मिळाला दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्याही उमेदवाराने प्रचाराला सुरवात केली नव्हती. 

मुंबई  ः शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केली होती मात्र शनिवारी चेंबूर परिसरात  सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केल्याने याचा परिणाम प्रचारावर पाहायला मिळाला दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्याही उमेदवाराने प्रचाराला सुरवात केली नव्हती. 
उमेदवारांनी शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नियोजन केलेले असते. त्यामुळे हे नियोजन पावसामुळे फिसकटले आहे. दुपार पर्यंत पाऊस थांबावा अशी अपेक्षा सर्व राजकीय पक्ष करीत आहे.

मतदानाच्या दिवशीही पाऊस
आज रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शहरातील 676 केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडप बांधण्यात आले असले तरी मोठा पाऊस आल्यास मतदारांना घरा बाहेर काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 

मुंबईसह कोकणातून परतीच्या मान्सुनचा प्रवास यंदा 14 दिवस विलंबाने सुरु झाला आहे.पहिल्यांदाज मतदानावर पावसाचे सावट आले आहे.पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन निवडणुक आयोगाने योग्य खबरदारी घेतली आहे. मात्र, पावसामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांचे संकट वाढवले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall on the last day's hype