पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द तर काहींना मध्येच ब्रेक

पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द तर काहींना मध्येच ब्रेक

मुंबई:  सामान्यांसाठी मुंबईची लोकल जरी सुरू नसली, तरी लोकल वाहतूक मात्र मुंबईत सुरू आहे. मात्र, ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी लोकल रखडल्याचे प्रकार घडले. मात्र, पावसाचा फटका बसला तो लांब पल्ल्याच्या गाड्यांना. अनेक गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या तर काही गाड्या या मुंबईबाहेरच थांबवण्यात आल्या. त्यामुळे या गाड्यांमधून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, मुंबईत पाऊस पडल्यामुळेच गाड्या रद्द करण्याची वेळ ओढवल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वेच्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्याच्या वेळा बदलण्यात आल्यात तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही एक्स्प्रेस गाड्यांना स्टेशनवर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. 

या रेल्वे गाडीच्या वेळापत्रकात बदल

  • 01019 मुंबई- भुवनेश्वर विषेश, रात्री 10 वाजता सुटणार
  • 05645 लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी – दुपारी 1 वाजता
  • 01301 CSMT-KSR बंगळुरू स्पेशल – दुपारी 12.30 वाजता
  • 02534 CSMT-लखनऊ स्पेशल – दुपारी 12.40 वाजता

या गाड्या थांबवण्यात आल्या

  • 01020 भुवनेश्वर-मुंबई विशेष – ठाणे स्टेशनवर थांबवली
  • 02810 हावडा-मुंबई विशेष- ठाणे स्टेशनवर थांबवली
  • 02702 हैद्राबाद-मुंबई- कल्याण स्टेशनवर थांबवली 
  • 01140- गडग- मुंबई – कल्याण स्टेशनवर थांबवली 

या गाड्या रद्द


  • 02110 मनमाड- मुंबई विशेष
  • 02109 मुंबई- मनमाड विशेष 


मुंबईच्या लोकलचं काय झालं?

दरम्यान, मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई लोकलला देखील बसला आहे. पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा हळूहळू पूर्वगतीवर येत आहे. सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पहिली डाऊन फास्ट जलद चर्चगेट विरार लोकल आणि अंधेरी ते चर्चगेट लोकल धावली आहे. तर मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा ठप्प आहे. दादर, माटुंगा, सायन, ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे उपनगरीय लोकल सेवा रद्द केली आहे.

------

(संपादनः पूजा विचारे) 

Rains disrupted train services canceled several trains

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com