Mumbai Rains : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर; अनेक भागात साचले पाणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मंगळवारी रात्रीपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात या पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचले आहे. उपनगरातही पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

मुंबई : मुंबई शहरात पूर्व आणि पश्चिम उपनगरात मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक सखोल भागात पाणी साचले असून, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

मंगळवारी रात्रीपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून अनेक सखल भागात या पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर पाणी साचले आहे. उपनगरातही पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

अंधेरी, बोरिवली, दादर, प्रभादेवी, वरळी, घाटकोपर, मुलुंड अशा ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबईसह ठाणे, पालघर या भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या सायन येथील गांधी नगर मार्केटमध्ये पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी काम करत आहेत. पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायर परिसरात पाणीच पाणी झाले असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सांताक्रूझमध्ये 58 मिमी, तर कुलाबामध्ये 171 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rains lash different parts of Mumbai throughout the night Water logging reported in many parts