पावसात भिजली मुंबईची फोन सेवा!

mtnl.jpg
mtnl.jpg

मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका एमटीएनएल सेवेला ही बसला आहे. सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे एमटीएनएल या सरकारी कंपनीचे इंटरनेट आणि फोन सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना याचा फटका बसला आहे.

मुंबईत केंद्र सरकारच्या एमटीएनएल या सरकारी कंपनीकडून फोन सुविधा पुरवली जाते. सरकारी कार्यालयांमध्ये आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आजही एमटीएनएलचे फोन वापरले जातात. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये एमटीएनएलचे इंटरनेट वापरले जाते. मात्र आज पावसामुळे एमटीएनएलची फोन आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.

सीएसएमटी येथील विभागात आज सकाळपासून एमटीएनएलची सेवा बंद आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या कार्यालयातील येणारे फोन बंद झाले आहेत. तसेच इंटरनेट सेवाही बंद असल्याने आज पालिकेच्या कार्यालयांमध्ये कामकाजावर परिणाम झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com